best10financerules

श्रीमंत व्हायचंय? फॉलो करा ‘पर्सनल फायनान्स’चे हे बेस्ट १० सुवर्ण नियम!

man holding money, finance rules

श्रीमंत शब्द ऐकूनच डोळ्यात एक चमक आली असेल, बरोबर! शब्दात काय जादू आहे काय माहिती, प्रत्येकाला श्रीमंत व्हाव वाटत, त्यासाठी करावे लागणारे कष्ट, प्लॅनिंग हे सर्व करायची तयारी आपली असते.

पण तरीपण आयुषात अशा काही गोष्टी घडतात की कळत नाही हे काय होतय, सगळ करतोय पण श्रीमंत होत नाही, म्हणजे पैसा टिकतच नाही मग श्रीमंत कसं होणार.

आपल्या सर्वांना आयुष्यात श्रीमंत व्हायचे असते, पण केवळ पैसे कमवून कोणी श्रीमंत होत नाही.

खरा श्रीमंत तोच असतो ज्याला आपले पैसे योग्य प्रकारे सांभाळता येतात. आजच्या धावपळीच्या युगात Personal Finance Rules समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल आणि कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडायचे असेल, तर हे १० आर्थिक नियम तुम्हाला नक्कीच मदत करतील.

पर्सनल फायनॅन्स म्हणजे काय?

पर्सनल फायनॅन्स शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल तुम्ही, instagram पोस्टमध्ये रील्समध्ये, शॉर्टमध्ये पण तुम्ही पहिला असेल, पण आपण इथे समजून घेऊ,

सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्याकडे येणारा पैसा, तुम्ही खर्च करणारा पैसा आणि तुम्ही वाचवलेला पैसा यांचे योग्य नियोजन म्हणजे ‘पर्सनल फायनान्स’. अनेक लोक पगार चांगला असूनही महिन्याच्या शेवटी पैशांसाठी त्रासलेले दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक शिस्तीचा अभाव.

१. ५०-३०-२० चा सुवर्ण नियम (50-30-20 Rule)

आर्थिक नियोजनातील हा सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी नियम आहे. हा नियम तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असू शकतो, हा नियम पर्सनल फायनॅन्स मध्ये खूप महत्वाचा आहे, तुमच्या निव्वळ उत्पन्नाची विभागणी खालीलप्रमाणे करा:

१. ५०% हिस्सा: आपल्या ‘गरजा’ (Needs) – ज्या टाळता येत नाहीत

तुमच्या पगाराचा अर्धा हिस्सा हा अशा गोष्टींसाठी आहे ज्यांच्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाहीस. हा खर्च एकदम महत्वाचा असतो, इथे आपण हलगर्जीपणा करतच नाही.

  • घरभाडे किंवा EMI: राहायला छप्पर पाहिजे, त्यामुळे हा खर्च सर्वात आधी येतो.
  • किराणा आणि दूध: रोजचं जेवण-खाण. यात हॉटेलिंग येत नाही किंवा पार्टी येत नाही, फक्त घरातल राशन येतो. जे काही दोन तीन वेळेचा अन्न आहे ते इथे येत.
  • लाईट, पाणी आणि गॅस बिल: हे बेसिक जगण्यासाठी लागणारी बिलं आहेत. आता तुम्हाला हे द्यायच नसल तरी द्याव लागत.
  • मुलांचे शिक्षण: शाळेची फी, बसचा खर्च, पुस्तके, हा खर्च उत्तम भविष्यासाठी तुम्ही करू शकता, ज्यांना लहान मुले आहेत त्यांच्यासाठीचा हा खर्च
  • दवाखाना: नियमित लागणारी औषधे किंवा आरोग्य विमा (Health Insurance).

समजा तुमचा पगार ४०,००० रुपये आहे, तर तुझे हे सगळे खर्च २०,००० रुपयांच्या आतच बसले पाहिजेत. जर तुझे फक्त घरभाडे आणि बिलंच २५ हजार होत असतील, तर तुम्ही बजेटच्या बाहेर जात आहात. अशा वेळी तुम्हाला एकतर घर बदलायला हवं किंवा खर्च कमी करायला हवेत.

२. ३०% हिस्सा: आपल्या ‘इच्छा’ (Wants) – जे आपल्याला हवंसं वाटतं

हा तुमच्या आयुष्यातील ‘मज्जा-मस्ती’चा विभाग आहे. आपण रात्रंदिवस राबतो ते कशासाठी? तर थोडे सुखाने जगण्यासाठी. पण इथेच लोक वाहवत जातात.

आत्ताच एक रील पहिली, की मित्रासोबत 10रुपयाचा चहा पिला , एवढे पैसे कमवून कुठे घेऊन जाणारे, त्यामुळे एंजॉय केला. तर एवढापण जास्त खर्च नको, 10 रुपये खूप झाले, हाहा! मस्करी करतोय.

  • बाहेर फिरणे आणि हॉटेलिंग: विकेंडला फॅमिलीसोबत डिनरला जाणं किंवा मित्रांसोबत पार्टी करणं एक आनंदी वातावरण ठेवायचे असेल तर हे खूप गरजेचे आहे.
  • चित्रपट आणि करमणूक: थिएटरमध्ये जाऊन सिनेमे पाहणं किंवा नेटफ्लिक्स, हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन.
  • शॉपिंग: नवीन फॅशनेबल कपडे, शूज, किंवा महागडा परफ्युम आणि बरच काही, याबद्दल जास्त बोलायला नकोच.
  • छंद (Hobbies): तुम्हाला जिम लावायची असेल, गिटार शिकायचं असेल किंवा ट्रेकिंगला जायचं असेल.

४०,००० पगारातले १२,००० रुपये तुम्ही यावर खर्च करू शकता. पण जर तुम्ही हप्त्यावर (EMI) आयफोन घेतला आणि त्याचं बिल ५ हजार येत असेल, तर तुमचे फिरण्याचे पैसे कमी होणार. म्हणजेच, ‘इच्छा’ पूर्ण करताना ती तुझ्या ३०% मर्यादेतच असायला हवी.

आता माझा एक मित्र आहे त्याने घेतला होता आयफोन, सहा हजाराचा EMI होता, त्याचा पगार १८,००० रुपये, आता तुम्हीच सांगा कितीच हुशार असेल तो, नाव नाही सांगणार ब्लॉग वाचला की, 2-4 फटके तर मी आरामशीर खाणारच!

३. २०% हिस्सा: बचत आणि गुंतवणूक (Savings) – तुझा ‘फ्युचर बॅकअप’

हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, जो लोक सहसा विसरतात. लोक काय करतात? पगार आला की खर्च करतात आणि मग ‘काही उरलं तर’ बचत करतात. हे साफ चुकीचं आहे!

  • इमर्जन्सी फंड: अचानक नोकरी गेली किंवा काही संकट आलं, तर किमान ६ महिने पुरेल एवढा पैसा साठवणे. याने एक भीती राहत नाही की अचानक नौकरी गेली तर काय करायचे.
  • गुंतवणूक (Investment): म्युच्युअल फंड (SIP), शेअर्स, सोनं किंवा पीपीएफ (PPF).
  • भविष्यासाठी बचत: मुलांचं लग्न, त्यांचं उच्च शिक्षण किंवा तुझं स्वतःचं निवृत्तीनंतरचं (Retirement) आयुष्य.

पगार ४०,००० असेल तर ८,००० रुपये तुझ्या डोळ्यासमोरून गायब झाले पाहिजेत. म्हणजे पगार आल्यावर आधी हे ८ हजार इन्व्हेस्ट करायचे आणि मग उरलेल्या ३२ हजारात महिना चालवायचा. ही सवय तुम्हाला १० वर्षांनंतर चांगला श्रीमंत बनवू शकते!

२. आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार करा

आपत्कालीन निधी म्हणजे नक्की काय?

हा तुमच्या बचतीचा असा हिस्सा आहे ज्याला तुम्ही साध्या सुध्या कारणांसाठी हात लावत नाही. जेव्हा आयुष्यात एखादं मोठं आर्थिक संकट उभं राहतं, तेव्हा तुम्हाला कुणासमोर हात पसरावे लागू नयेत, यासाठी ठेवलेला हा ‘राखीव निधी’ आहे.

हा निधी किती असावा? (Calculation)

  • नियम: तुमच्या महिन्याच्या एकूण खर्चाच्या (ज्यात घरभाडं, रेशन, बिलं, EMI सगळं आलं) किमान ६ पट रक्कम जमा असावी.
  • उदाहरण: जर तुमचा महिन्याचा खर्च २५,००० रुपये असेल, तर तुमच्याकडे किमान १.५ लाख रुपये (२५,००० x ६) आपत्कालीन निधी म्हणून तयार हवेत. जर तुमची नोकरी थोडी रिस्की असेल, तर हा फंड १२ महिन्यांचा ठेवावा.

हा पैसा कुठे ठेवायचा? (Liquidity)

इमर्जन्सी फंड अशा ठिकाणी असावा जिथून तुम्ही तो एका तासाच्या आत काढू शकता.

  • बचत खाते (Savings Account): एक वेगळं बँक खाते उघडा ज्याचा वापर तुम्ही रोजच्या खर्चासाठी करणार नाही.
  • लिक्विड फंड (Liquid Funds): म्युच्युअल फंडमधील हा प्रकार सुरक्षित असतो आणि पैसे लवकर मिळतात.
  • एफडी (Fixed Deposit): तुम्ही बँकेत ‘स्विप-इन’ एफडी करू शकता, जी गरज पडल्यावर कधीही मोडता येते.
  • रोख रक्कम: थोडी रक्कम (उदा. १०-२० हजार) घरातही रोख स्वरूपात ठेवा, कारण कधीकधी एटीएम किंवा इंटरनेट चालत नाही.

हा फंड कधी वापरायचा? (कठोर नियम)

लोक इथेच चूक करतात. नवीन आयफोन घ्यायचा आहे किंवा मित्राचं लग्न आहे म्हणून हा पैसा काढायचा नाही. हा पैसा फक्त या कारणांसाठीच वापरा:

  • नोकरी सुटणे: नवीन नोकरी मिळेपर्यंत घर चालवण्यासाठी.
  • वैद्यकीय आणीबाणी: अचानक आलेला हॉस्पिटलचा मोठा खर्च.
  • घराची किंवा गाडीची तातडीची दुरुस्ती: ज्याशिवाय काम अडकलं आहे.

आपत्कालीन निधी तयार कसा करायचा? (Step-by-Step)

  • लहान सुरुवात करा: एकदम १.५ लाख जमणार नाहीत. दरमहा पगारातून ५% किंवा १०% रक्कम बाजूला काढायला सुरुवात करा.
  • बोनसचा वापर करा: दिवाळी बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळाला की तो खर्च न करता थेट या फंडमध्ये टाका.
  • पगार वाढला की बचत वाढवा: जसा पगार वाढेल, तसा तुमचा आपत्कालीन निधीचा टप्पाही वाढवा.

याचे फायदे काय?

  • मानसिक शांतता: बँक खात्यात ६ महिन्यांचे पैसे बॅकअपला आहेत, हे माहिती असल्यावर नोकरीवर किंवा आयुष्यात कितीही तणाव आला तरी माणूस घाबरत नाही.
  • कर्जापासून सुटका: संकट काळात लोक क्रेडिट कार्ड किंवा खाजगी सावकाराकडून महागडं कर्ज घेतात. हा फंड तुम्हाला व्याजाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवतो.

थोडक्यात सांगायचं तर आपत्कालीन निधी म्हणजे तुमच्या आर्थिक इमारतीचा पाया आहे. घर कितीही सुंदर बांधलं तरी पाया कच्चा असेल तर घर पडणारच. म्हणूनच, गुंतवणूक करण्याआधी हा पाया मजबूत करा!

३. ३० दिवसांचा नियम (30-Day Rule)

३० दिवसांचा नियम (30-Day Rule): अनावश्यक खर्चावर ताबा मिळवण्याची जालीम पद्धत

आपण अनेकदा भावनेच्या भरात किंवा केवळ सेल आहे म्हणून विचार न करता वस्तू खरेदी करतो. अशा वेळी हा नियम तुम्हाला आर्थिक नुकसानीपासून वाचवतो.

उतावीळ खरेदीला बसवा लगाम (Stop Impulse Buying) जेव्हा आपल्याला एखादी वस्तू मनापासून आवडते, तेव्हा आपल्या मेंदूत ‘डोपामाइन’ नावाचं रसायन पाझरतं, जे आपल्याला ती वस्तू लगेच घ्यायला भाग पाडतं. हा नियम सांगतो की, जेव्हाही तुम्हाला एखादी महागडी वस्तू घेण्याची तीव्र इच्छा होईल, तेव्हा स्वतःला सांगा – “मी ही वस्तू घेणार आहे, पण आज नाही, बरोबर ३० दिवसांनंतर.” या मधल्या काळात तुमची ती खरेदीची तात्पुरती ओढ शांत होते आणि तुम्ही वस्तूचा विचार भावनेऐवजी प्रॅक्टिकली करू लागता.

गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा (Need vs Want) ३० दिवसांचा काळ हा एक ‘चाचणी काळ’ असतो. या दिवसांत तुम्हाला स्वतःहून समजते की ती वस्तू तुमच्या जगण्यासाठी खरोखर आवश्यक आहे की ती फक्त एक चैनीची इच्छा आहे. अनेकदा असं होतं की, १०-१५ दिवसांनंतर आपल्याला त्या वस्तूची ओढ राहत नाही किंवा आपण ती वस्तू विसरूनही जातो. जर ३० दिवसांनंतरही तुम्हाला त्या वस्तूची गरज तितकीच तीव्र वाटत असेल, तरच ती खरेदी करणे योग्य ठरते.

फसव्या जाहिरातींपासून संरक्षण (Protection from Marketing) कंपन्या नेहमी “Limited Time Offer” किंवा “Last Few Pieces Left” अशा जाहिराती करून आपल्याला घाईत निर्णय घ्यायला लावतात. ३० दिवसांचा नियम पाळल्यामुळे तुम्ही अशा मार्केटिंगच्या जाळ्यात अडकत नाही. या काळात तुम्हाला त्या वस्तूचे रिव्ह्यू वाचायला, इतर ठिकाणी किंमत तपासायला आणि त्यापेक्षा चांगला किंवा स्वस्त पर्याय उपलब्ध आहे का, हे शोधायला पुरेसा वेळ मिळतो.

आर्थिक पश्चात्तापापासून सुटका (Avoid Buyer’s Remorse) खूप वेळा आपण वस्तू विकत घेतो आणि दोन दिवसांनी आपल्याला वाटतं की “उगाच पैसे वाया घालवले, याची काही गरज नव्हती.” याला ‘बायर्स रिमोर्स’ म्हणतात. ३० दिवसांचा नियम तुम्हाला अशा पश्चात्तापापासून वाचवतो. जेव्हा तुम्ही महिनाभर विचार करून एखादी गोष्ट घेता, तेव्हा ती तुमच्या बजेटमध्ये बसते आणि ती घेतल्याचा तुम्हाला आनंद मिळतो, ओझं वाटत नाही.

४. १०-५-३ चा परतावा नियम (10-5-3 Rule)

गुंतवणूक करताना किती परतावा (Return) अपेक्षित ठेवावा, हे ठरवणे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक गुंतवणूक साधनाचा धोका (Risk) आणि परतावा वेगवेगळा असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना खालील साधारण नियम लक्षात ठेवला जातो. आता तुम्हाला सांगतो की हे प्रत्येकवेळी लागू होईल असे नाही.

१०% – इक्विटी किंवा म्युच्युअल फंड:
शेअर मार्केट किंवा इक्विटी म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय मानले जातात. इतिहास पाहिला तर लांब कालावधीत (10–15 वर्षे) यामधून सरासरी सुमारे १०% किंवा त्यापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. मात्र यात बाजारातील चढउतार जास्त असल्यामुळे थोडा धोका असतो.

५% – डेट फंड किंवा मुदत ठेव (FD):
डेट म्युच्युअल फंड, बँक FD किंवा इतर सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमधून साधारणपणे ५% च्या आसपास परतावा मिळू शकतो. जास्त पण मिळतो ,यात धोका कमी असतो, त्यामुळे भांडवल सुरक्षित राहते; पण परतावा इक्विटीपेक्षा कमी असतो.

३% – बचत खाते (Savings Account):
बँकेच्या बचत खात्यात ठेवलेल्या पैशांवर साधारणपणे ३% च्या आसपास व्याज मिळते. हा पर्याय अत्यंत सुरक्षित असला तरी परतावा खूप कमी असतो. त्यामुळे दीर्घकालीन संपत्ती वाढवण्यासाठी केवळ बचत खात्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. हे पैसे आपण लगेच्या लगेच काढू पण शकतो.

यामुळेच गुंतवणुकीत संतुलन ठेवणे (Asset Allocation) खूप महत्त्वाचे असते. काही पैसा इक्विटीमध्ये, काही सुरक्षित साधनांमध्ये आणि काही तरल (liquid) स्वरूपात ठेवला तर दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते. पैसा असा असला पाहिजे की, कामाच्या वेळी कामी आला पाहिजे, त्यामुळे जे काही करायचे ते विचार करूनच!

५. विम्याचे महत्त्व (Insurance is Must)

गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता. अनेक लोक थेट गुंतवणूक सुरू करतात, पण अचानक आजार, अपघात किंवा कमावणाऱ्या व्यक्तीला काही झाले तर संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडू शकते. म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य Life Insurance आणि Health Insurance असणे अत्यंत गरजेचे आहे.

Life Insurance (टर्म इन्शुरन्स):
जर कुटुंबाचा मुख्य कमावणारा सदस्य अचानक नसला, तर कुटुंबाला आर्थिक अडचण येऊ नये यासाठी टर्म इन्शुरन्स महत्त्वाचा असतो. साधारणपणे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० ते १५ पट इतका टर्म इन्शुरन्स कव्हर असावा, असा आर्थिक तज्ञांचा सल्ला असतो. टर्म इन्शुरन्समध्ये प्रीमियम कमी असतो आणि मोठे कव्हर मिळते.

Health Insurance (आरोग्य विमा):
आजच्या काळात वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढत आहे. एखादी मोठी आजारपणाची वेळ आली तर लाखो रुपये खर्च होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाकडे फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असणे आवश्यक आहे. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना एका पॉलिसीत संरक्षण मिळते आणि अचानक होणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा आर्थिक ताण कमी होतो.

म्हणूनच गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी योग्य विमा संरक्षण असणे हा पर्सनल फायनान्सचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे.
यामुळे तुमचे आर्थिक नियोजन सुरक्षित राहते आणि भविष्यातील जोखीम कमी होते.

६. निवृत्तीसाठी लवकर सुरुवात करा (Retirement Planning)

अनेकांना वाटते की निवृत्तीचे (Retirement) नियोजन वयाच्या ४० नंतर सुरू करावे, पण ही मोठी चूक आहे. प्रत्यक्षात जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू करता, तितका जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो. कारण वेळ ही गुंतवणुकीतील सर्वात मोठी ताकद असते.

जर तुम्ही वयाच्या २०–२५ व्या वर्षापासून थोड्या रकमेने गुंतवणूक सुरू केली, उदाहरणार्थ SIP (Systematic Investment Plan) द्वारे दरमहा काही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली, तर दीर्घकालीन कालावधीत मोठा निधी तयार होऊ शकतो.

यामागचे मुख्य कारण म्हणजे चक्रवाढ व्याज (Compound Interest). यात तुमच्या मूळ गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळत राहते. कालांतराने ही रक्कम वेगाने वाढत जाते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या २५ व्या वर्षी दरमहा ₹५,००० ची SIP सुरू केली आणि सरासरी १०–१२% परतावा मिळाला, तर निवृत्तीच्या वयापर्यंत त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.

म्हणूनच निवृत्ती नियोजन जितके लवकर सुरू कराल, तितकी भविष्यातील आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल.

७. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण करा

केवळ एका नोकरीवर किंवा एका उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहणे दीर्घकालीन दृष्टीने धोकादायक ठरू शकते. नोकरी गमावणे, व्यवसायात मंदी येणे किंवा अचानक आर्थिक अडचण निर्माण होणे यासारख्या परिस्थितींमध्ये एकाच उत्पन्नावर अवलंबून असणे मोठी समस्या ठरू शकते. त्यामुळे आर्थिक स्थैर्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत (Multiple Income Sources) तयार करणे महत्त्वाचे आहे.

आजच्या काळात मुख्य नोकरीसोबत जोडधंदा किंवा साइड इनकम तयार करणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, फ्रीलान्सिंग, ऑनलाइन काम, ब्लॉगिंग, डिजिटल प्रॉडक्ट्स विकणे किंवा छोटा व्यवसाय सुरू करणे यांसारख्या मार्गांनी अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.

तसेच गुंतवणुकीद्वारेही उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतात. स्टॉक मार्केटमधील डिव्हिडंड, भाड्याने दिलेली मालमत्ता (घरभाडे), म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक पर्याय यांमधून नियमित उत्पन्न मिळू शकते.

म्हणूनच आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी किमान २ ते ३ उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याचा प्रयत्न करणे हा पर्सनल फायनान्सचा महत्त्वाचा नियम आहे.

८. कर्जाचे नियोजन (Debt Management)

सर्वच कर्ज वाईट नसतात. काही कर्जे योग्य कारणांसाठी घेतली असतील तर ती उपयुक्तही ठरू शकतात. उदाहरणार्थ, शिक्षणासाठी घेतलेले कर्ज किंवा घर खरेदीसाठी घेतलेले होम लोन हे दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. मात्र अनावश्यक आणि जास्त व्याजदर असलेले कर्ज टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

विशेषतः Consumer Debt जसे की क्रेडिट कार्ड लोन, पर्सनल लोन किंवा फक्त खर्चासाठी घेतलेली कर्जे यापासून शक्यतो दूर राहावे. अशा कर्जांवर व्याजदर जास्त असतात आणि वेळेत फेडले नाही तर आर्थिक ताण वाढू शकतो.

आर्थिक तज्ञांच्या मते, तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ३५–४०% पेक्षा जास्त रक्कम EMI मध्ये जाऊ नये. जर तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग कर्ज फेडण्यात जात असेल, तर बचत आणि गुंतवणुकीसाठी पुरेशी रक्कम उरत नाही.

म्हणूनच शक्य तितक्या लवकर जास्त व्याजदर असलेली कर्जे आधी फेडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्यावरचा आर्थिक ताण कमी होईल आणि भविष्यात गुंतवणुकीसाठी अधिक पैसे उपलब्ध होतील.

९. गुंतवणुकीचे विविधीकरण (Diversification)

पर्सनल फायनान्समध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे — “तुमची सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका.” याचा अर्थ असा की तुमचे सर्व पैसे एकाच गुंतवणूक पर्यायात ठेवणे धोकादायक ठरू शकते. जर त्या एका गुंतवणुकीत नुकसान झाले, तर तुमची संपूर्ण बचत धोक्यात येऊ शकते.

म्हणूनच गुंतवणूक करताना विविधता (Diversification) ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच तुमची रक्कम वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांमध्ये विभागून गुंतवणे. यामुळे धोका कमी होतो आणि दीर्घकालीन स्थिर परतावा मिळण्याची शक्यता वाढते.

उदाहरणार्थ, काही रक्कम शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू शकता जे दीर्घकालीन वाढीसाठी उपयुक्त असतात. त्याचबरोबर सोने हे आर्थिक अस्थिरतेच्या काळात सुरक्षित पर्याय ठरू शकते. फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) यांसारख्या सुरक्षित साधनांमध्येही काही हिस्सा ठेवणे फायदेशीर ठरते.

अशा प्रकारे वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये पैशांची योग्य विभागणी केल्यास धोका कमी होतो आणि तुमचे आर्थिक पोर्टफोलिओ अधिक मजबूत बनते.

१०. स्वतःवर गुंतवणूक करा (Invest in Yourself)

सर्वात जास्त परतावा देणारी गुंतवणूक म्हणजे स्वतःच्या ज्ञानावर आणि कौशल्यांवर केलेली गुंतवणूक. पैसे कमवण्याचे खरे सामर्थ्य तुमच्या ज्ञानात आणि कौशल्यांमध्ये असते. त्यामुळे स्वतःला सतत सुधारत राहणे हे आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे आहे.

आजच्या स्पर्धात्मक जगात नवीन कौशल्ये (Skills) शिकणे आवश्यक झाले आहे. डिजिटल कौशल्ये, व्यवसाय कौशल्ये किंवा तुमच्या क्षेत्राशी संबंधित तांत्रिक कौशल्ये शिकल्यास तुमची कमाईची क्षमता वाढू शकते.

तसेच आर्थिक साक्षरता (Financial Literacy) वाढवण्यासाठी आर्थिक विषयांवरील पुस्तके वाचणे, तज्ञांचे लेख किंवा ब्लॉग वाचणे आणि सेमिनार किंवा वर्कशॉपमध्ये सहभागी होणे फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला पैसे व्यवस्थापन, गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करण्याबद्दल अधिक चांगले ज्ञान मिळते.

लक्षात ठेवा, तुम्ही जितके जास्त शिकाल, तितकी तुमची कमाई करण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे स्वतःवर केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टीने सर्वात फायदेशीर ठरते.

खर्चाचे नियोजन: गरजा vs इच्छा

खालील तक्ता तुम्हाला तुमचे पैसे कुठे जात आहेत हे समजून घेण्यास मदत करेल:

प्रकारउदाहरणेप्राधान्य (Priority)
अत्यावश्यक (Needs)अन्न, घर, औषधे, शिक्षणउच्च (High)
इच्छा (Wants)नेटफ्लिक्स, नवीन फॅशनेबल कपडे, हॉटेलिंगमध्यम (Medium)
भविष्य (Future)निवृत्ती निधी, मुलांचे शिक्षणसर्वोच्च (Highest)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१. गुंतवणुकीसाठी किती पैसे लागतात? तुम्ही अगदी ५०० रुपयांपासून म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.

२. क्रेडिट कार्ड वापरणे चुकीचे आहे का? नाही, जर तुम्ही दरमहा बिल पूर्ण भरत असाल तर क्रेडिट कार्ड फायदेशीर आहे. मात्र, केवळ मिनिमम ड्यु (Minimum Due) भरणे तुम्हाला कर्जाच्या खाईत ढकलू शकते.

३. सर्वात सुरक्षित गुंतवणूक कोणती? पीपीएफ (PPF) आणि सरकारी बॉण्ड्स हे सर्वात सुरक्षित मानले जातात, परंतु त्यांचा परतावा महागाईच्या तुलनेत कमी असू शकतो.

४. महागाई (Inflation) म्हणजे काय? आज जी वस्तू १०० रुपयांना मिळते, ती पुढच्या वर्षी १०६ रुपयांना मिळणे म्हणजे महागाई. आपली गुंतवणूक किमान ७-८% पेक्षा जास्त परतावा देणारी असावी जेणेकरून महागाईवर मात करता येईल.

५. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे जुगार आहे का? अभ्यास न करता पैसे लावणे हा जुगार आहे. पण योग्य कंपन्यांचे विश्लेषण करून दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक ही संपत्ती निर्मितीचे उत्तम साधन आहे.

आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे ही एका रात्रीची प्रक्रिया नाही, तर ती एक शिस्त आहे. वर दिलेले Personal Finance Rules आजपासूनच अंमलात आणायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, “तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती वाचवता आणि ते कुठे गुंतवता, हे जास्त महत्त्वाचे आहे.”

तुम्ही तुमच्या पगारातील किती टक्के बचत करता? आणि सोबतच खाली दिलेल्या 2 प्रश्नाचे अचूक उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

  • प्रश्न 1. आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक चूक कोणती? (जी इतरांनी टाळावी असे तुम्हाला वाटते?)
  • प्रश्न 2. “तुमच्या मते ‘श्रीमंत असणे’ म्हणजे नक्की काय? बँकेत खूप पैसा असणे की मानसिक शांतता असणे?”

8 thoughts on “श्रीमंत व्हायचंय? फॉलो करा ‘पर्सनल फायनान्स’चे हे बेस्ट १० सुवर्ण नियम!”

  1. प्रश्न 1:
    माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी आर्थिक चूक म्हणजे पैसे मिळाले की त्याचा विचार न करता खर्च करणे. आधी मला वाटायचं की पैसे पुन्हा येतील, मग बचत नंतर करू. त्यामुळे बचतीची सवयच लागली नाही.
    पण नंतर लक्षात आलं की जर सुरुवातीपासून थोडी थोडी बचत केली असती तर आज हातात चांगली रक्कम असती. त्यामुळे माझ्या मते प्रत्येकाने कितीही कमी पैसे मिळाले तरी त्यातून थोडे पैसे बाजूला ठेवले पाहिजेत. ही सवय लवकर लागली तर पुढे खूप फायदा होतो.

    प्रश्न 2:
    माझ्या मते श्रीमंत असणे म्हणजे फक्त बँकेत खूप पैसे असणे नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे पुरेसे पैसे आहेत आणि त्याचं मन शांत आहे.
    जर एखाद्याकडे खूप पैसा असेल पण तो नेहमी चिंता आणि तणावात असेल, तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. म्हणून माझ्या मते खरे श्रीमंत तेच आहेत जे आपल्या आयुष्यात समाधानी आहेत, त्यांची गरज भागते आणि ते आनंदाने जीवन जगतात. 🙂

  2. Sandeep Waghmare

    Khup chan mahaiti aahe…
    He sarv follow kele tr nakkich Aamhi rich banu shakto….
    Thanking you sir.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *